top of page
Search

सांगली विभाग द्राक्ष बागायतदार संघाचे नवे सचिव व संचालकांचा सत्कार

  • Writer: Rohit more
    Rohit more
  • Aug 31, 2024
  • 1 min read



महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे यांच्यावतीने सांगली विभाग द्राक्ष बागायतदार संघाच्या सचिव पदी मा.तुकाराम नागू माळी तसेच संचालक पदी नागठाणे गावचे द्राक्ष बागायतदार मा.सरदार शामराव मांगलेकर तसेच वाळवा संचालक पदी बापू दत्तू माळी व कुंडल गावचे मित्र जितेंद्र बाबुराव जाधव यांच्या निवडी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व अभिनंदन केले.

तसेच द्राक्ष बागायतदार शेतकरी व महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ या सर्वांच्या कामांसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माझ्या समवेत उपस्थित चंद्रकांत अहिर,माजी उपसरपंच पोपट तात्या अहिर,तंटामुक्ती अध्यक्ष मा.नंदू पाटील (बंधू),आमचे लहान बंधू केदार नायकवडी, उमेश कानडे,संजय नवले,संजय मोरे,धनाजी महाजन,राजू माळी,अतुल भिलवडे अमोल वाजे ,मानाजी सापकर,डी.सी शेळके व सर्व द्राक्ष बागायतदार शेतकरी उपस्थित होते.


 
 
 

Comments


bottom of page