महिला सशक्तीकरणाचा जागर: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि गौरव नायकवडींचे योगदान
- Rohit more
- Oct 8, 2024
- 1 min read





मुख्यमंत्री लाडकी बहीण संपर्क अभियानांतर्गत इस्लामपूर विधानसभा क्षेत्रातील वाळवा परिसरातील माता-भगिनींसाठी संवाद मेळावा स्वर्गीय नागनाथ अण्णांच्या स्मारकात संपन्न झाला. या मेळाव्याचे आयोजन शिवसेना प्रभारी युवा नेते गौरव नायकवडी आणि स्नेहल नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमात गौरव नायकवडी यांनी महायुती सरकारने राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकरी वीज बिल माफी योजना, लाडका भाऊ योजना, मुलींना शिक्षणात फी सवलत, शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना आणि नमो किसान योजनेंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीची माहिती त्यांनी महिलांना दिली. महायुती सरकारने लोकांच्या अडचणीच्या काळात मोठ्या प्रमाणावर मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महायुतीच्या कार्यकाळात रस्ते आणि विविध विकासकामे झाली, तर महाविकास आघाडीच्या काळात १८ तास लोडशेडिंग होत असल्याची आठवण त्यांनी उपस्थित महिलांना करून दिली. स्नेहल नायकवडी यांनी महिलांना भविष्यात सक्षम होण्याचे आवाहन केले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे महत्त्व सांगितले. यावेळी उपस्थित महिलांनी महायुती सरकारने केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमात तेजस्विनी शहा यांनी फनी गेम आणि पैठणी लकी ड्रॉ यांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच संदेश कांबळे, माजी उपसरपंच पोपट अहिर, ग्रामपंचायत सदस्या शर्मिली अहिर, आशा कदम, अपर्णा साळुंखे, प्रतिभा मुळीक, सुमन कांबळे, उमेश घोरपडे, डॉ. राजेंद्र मुळीक, उमेश कानडे, नंदू गावडे, अनिकेत डवंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Comments